Sunday, March 22, 2009

होळी-धुलीवंदन


होळीच्या आधी दोन दिवस म्हणजे रविवार पासूनच मनात एक हूरहुर लागून राहिली होती की, ह्या होळीला तर काहीच धमाल येणार नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आईच्या हाताची पुरणपोळी खायला नाही मिळणार. मी तर खूपच उदास होते. आणि त्यात पुढच्या आठवड्यात परीक्षा असल्याने तर रंगपंचमी खेळणा सुधा अवघड होता.
तरीही मी कुठुनतरी गुलाल मिळवण्यात यश मिळवला. होळी नाही निदान धुलीवंदन तर खेळलच पाहिजे असा मला सारखा वाटत होता.
पुण्यात असताना आम्ही सगळे मिळून होळी पेटवायचो. आणि होळी पेटलिकी मोठ्याने बॉम्बा मारायचो. खरच अविस्मरनिय दिवस आहेत ते.
आणि दुसर्या दिवशी तर खूपच मज्जा.... धुलीवंदन!!!!!!!!!!!! माझा आवडता सण. तशी माज़ी तयारी आठवडाभर आधीच चालू व्हायची. आमच्या बिल्डिंग मधे बच्चे पार्टीमधे तशी मी सगळ्यात मोठी. मग काय सगळी गँग घेऊन मी गच्ही वर जाणार. आणि खूप पाण्याचे फुगे फुगवायाचे आणि रस्त्यावर चालणार्‍या एकाला सुधा सोडायाचे नाही. आणि धुलीवंदन च्या दिवशी तर आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन रांग खेळायचो.
ह्या आठवणी तर विसरनं खूपच कठीण आहे.
हो तर गुलाला मिळाल्यानंतर माज़ी एक मैत्रीण माज़या रूमवर आली. माज़या मनात एकदूम काय आला काय माहीत, पूर्ण गुलालाने मी तिला माखून टाकलं.
पण नंतर मला वाटलं की आता माज़ी काही खैर नाही. ही तर माज़ी कंप्लेंट करणार.... पण खरं सांगू तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने मला कडकडून मिठी मारली. आणि म्हणाली अदिती धन्यवाद. खरच मी पण खूप मिस करत होते हा सण.......
मग तर मी विचार केला सगळ्यांच्या रूममधे जाउन रंग खेळायचे. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही दोघींनी चौथ्या मजल्या पासून सुरूवात केली.
आणि म्हणता म्हणता 40 जणी जमलो. मन भरून आम्ही त्या थोड्याश्या गुलालमधे ओतप्रोत नहून गेलो. प्रत्येकाच्या चेहर्यावरचा तो आनंद मी अजूनही विसरू शकत नाही. प्रत्येक जन हेच म्हणत होता की धन्यवाद अदिती, सकल पौण आम्ही खूप मिस करत होतो हा सण.
आणि खरं सांगू माज़या हॉस्टेल मधील काही पाश्चात्य देशातील मुलीही आमच्या बरोबर होळीच्या सणाची मजा लुटली.
तर असाहा होलीचा दिवस अमेरिका मधे असूनही त्या गुलालाच्या रंगा सोबत एक वेगळीच छटा उमटौन गेला.

No comments:

Post a Comment