माझी परीक्षा संपली आणि आता स्प्रिंग ब्रेक चालू आहे..... हॉस्टेल वॉर खूपच कंटाळा आला होता म्हणून मग मी इथेच ओळख झालेल्या एका भारतीय फॅमिली कडे 2 दिवस राहायला गेले होते. आजच परत आले.....
ते जिथे रहातात त्या शहराला मिनी इंडिया असे म्हणतात. आणि तिकडे तुम्हाला भारतात गेल्याचा भास होतो. खूप सारे भारतीया दुकाने, आणि हो लोक सुद्धा....
आम्ही तिकडे गेल्या गेल्या रासराज म्हणून एका मिठाईच्या दुकानात गेलो... मनभरून चाट खाल्ला... फक्कड गरम चहा प्यायला आणि मग घरी गेलो...
मला तर भारी मज्जा वाटत होती.... पण खरं भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तिकडे एक भारत नक्की स्थापन करतो.
आज मी रोहित सोबत शूटिंग रनगे ला गेले होते. सुरुवातीला मला खूप भीती वाटली. मी पूर्णच थरथर कापत होते.
तिथे जाण्याआधी तुम्हाला सगळ्या सूचना दिल्या जातात. मग हेडफोन आणि आइग्लासेस दिले जातात.
मग आतमाधे जाण्याआधीच तुम्हाला हेडफोन लावावे लागतात. मग निवडलेला टार्गेट लावून नेम पकडायाचा आणि ट्रिग्गर दबयाचा
ठो ठो.......... बापरे तो आवाज ऐकून मी खूप घाबरले. खरी बंदुक हातात पकडून मी आधीच गार झाले होते. त्यात ते सगळिकडून येणारे बंदुकीचे आवाज ऐकून मी तिथून बाहेर आले. पण जितक्या वेळा बंदुक चळवळी नेम काही चुकला नाही.....
पण खरं सांगू जेव्हा मी तिथून बाहेर आले ना खूप सारे प्रश्ना मनात घर करून बसले होते. जेव्हा हे आतन्कवादि लहान - लहान मुलांच्या हातात बंदुकी देतात, तेव्हा त्याना काहीच नसेल का वाटत त्या निष्पाप जीवानबद्दल....... तो आवाज हृदय कापून टाकणारा असतो.
जेव्हा आपले वीर जवान सीमेवर लढत असतात, तेव्हा किती निधड्या छातीने त्या अगणित गोळयांचे सामने करत लढत असतात.
असो.... तिथून मात्र मी खुश होऊन निघाले, कारण मी आज काहीतरी नवीन शिकले होते.
दुसर्या दिवशी भारतीय वेळवनुसार गुढी पाडवा सुरू झाला होता तेव्हा घरी परत येण्याधी त्यानी मला मंदिरात नेलं.... सात महिन्या नंतर देवळात जाणं म्हणजे मस्त वाटत होतं.... मनभरून मी देवाला पाहून घेतलं. आणि देवाला एकच गोष्टा मागितली की, असेच तुज़े द्रशन वेळोवेळी होऊ देत... आणि मग घरी परतले.....
पण एकंदर माझ्या सुट्टीचे 2 दिवस मजेत गेले......
Sunday, March 29, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment