Friday, March 27, 2009

गुढी पाडवा!!!


शिशिर ऋतुतील झोम्बनार्‍या वार्‍याची अंगाभोवती पडलेली मिठी
सैलसर होऊ लागली की समजावे आला, ऋतूराज आला.
ऋतूराज वसंताचं आगमन मनाला सुखावु लागतं.
होळीचे रंग फिकट नाही होत तोच-
नव्या संकल्पांची नांदी गात, नव वर्षाचा पहिला दिवस
मांगल्याच्या पावलानं अलगद अंगणी अवतरतो.

गुढी पाडवा!!!!!!!!!!!!!!!
चैत्र शुद्ध प्रतिपदा!!! साडेतीन मुहूर्तापैकी एक मंगल मुहूर्त....

ब्रम्हपुरणानुसार जगाच्या उत्पत्तिचा पहिला दिवस...
श्री रामचंद्र 14 वर्षांचा वनवास भोगून अयोध्येला परतले तो भरतभेटिचा दिवस...
शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून विजय पताका फडकवला तो दिवस...

गुढीपाडवा! सोने, चांदी, धानाच्या रूपाने घरी कायम लक्ष्मीचे वास्तव्य करण्याचा दिवस....
धनसंचायनाचा मंगल मुहूर्त!!!

या मंगल दिनी नव्या संकल्पांसाठी आपणास नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment