माझी परीक्षा संपली आणि आता स्प्रिंग ब्रेक चालू आहे..... हॉस्टेल वॉर खूपच कंटाळा आला होता म्हणून मग मी इथेच ओळख झालेल्या एका भारतीय फॅमिली कडे 2 दिवस राहायला गेले होते. आजच परत आले.....
ते जिथे रहातात त्या शहराला मिनी इंडिया असे म्हणतात. आणि तिकडे तुम्हाला भारतात गेल्याचा भास होतो. खूप सारे भारतीया दुकाने, आणि हो लोक सुद्धा....
आम्ही तिकडे गेल्या गेल्या रासराज म्हणून एका मिठाईच्या दुकानात गेलो... मनभरून चाट खाल्ला... फक्कड गरम चहा प्यायला आणि मग घरी गेलो...
मला तर भारी मज्जा वाटत होती.... पण खरं भारतीय माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला ना तिकडे एक भारत नक्की स्थापन करतो.
आज मी रोहित सोबत शूटिंग रनगे ला गेले होते. सुरुवातीला मला खूप भीती वाटली. मी पूर्णच थरथर कापत होते.
तिथे जाण्याआधी तुम्हाला सगळ्या सूचना दिल्या जातात. मग हेडफोन आणि आइग्लासेस दिले जातात.
मग आतमाधे जाण्याआधीच तुम्हाला हेडफोन लावावे लागतात. मग निवडलेला टार्गेट लावून नेम पकडायाचा आणि ट्रिग्गर दबयाचा
ठो ठो.......... बापरे तो आवाज ऐकून मी खूप घाबरले. खरी बंदुक हातात पकडून मी आधीच गार झाले होते. त्यात ते सगळिकडून येणारे बंदुकीचे आवाज ऐकून मी तिथून बाहेर आले. पण जितक्या वेळा बंदुक चळवळी नेम काही चुकला नाही.....
पण खरं सांगू जेव्हा मी तिथून बाहेर आले ना खूप सारे प्रश्ना मनात घर करून बसले होते. जेव्हा हे आतन्कवादि लहान - लहान मुलांच्या हातात बंदुकी देतात, तेव्हा त्याना काहीच नसेल का वाटत त्या निष्पाप जीवानबद्दल....... तो आवाज हृदय कापून टाकणारा असतो.
जेव्हा आपले वीर जवान सीमेवर लढत असतात, तेव्हा किती निधड्या छातीने त्या अगणित गोळयांचे सामने करत लढत असतात.
असो.... तिथून मात्र मी खुश होऊन निघाले, कारण मी आज काहीतरी नवीन शिकले होते.
दुसर्या दिवशी भारतीय वेळवनुसार गुढी पाडवा सुरू झाला होता तेव्हा घरी परत येण्याधी त्यानी मला मंदिरात नेलं.... सात महिन्या नंतर देवळात जाणं म्हणजे मस्त वाटत होतं.... मनभरून मी देवाला पाहून घेतलं. आणि देवाला एकच गोष्टा मागितली की, असेच तुज़े द्रशन वेळोवेळी होऊ देत... आणि मग घरी परतले.....
पण एकंदर माझ्या सुट्टीचे 2 दिवस मजेत गेले......
Sunday, March 29, 2009
Friday, March 27, 2009
गुढी पाडवा!!!
शिशिर ऋतुतील झोम्बनार्या वार्याची अंगाभोवती पडलेली मिठी
सैलसर होऊ लागली की समजावे आला, ऋतूराज आला.
ऋतूराज वसंताचं आगमन मनाला सुखावु लागतं.
होळीचे रंग फिकट नाही होत तोच-
नव्या संकल्पांची नांदी गात, नव वर्षाचा पहिला दिवस
मांगल्याच्या पावलानं अलगद अंगणी अवतरतो.
गुढी पाडवा!!!!!!!!!!!!!!!
चैत्र शुद्ध प्रतिपदा!!! साडेतीन मुहूर्तापैकी एक मंगल मुहूर्त....
ब्रम्हपुरणानुसार जगाच्या उत्पत्तिचा पहिला दिवस...
श्री रामचंद्र 14 वर्षांचा वनवास भोगून अयोध्येला परतले तो भरतभेटिचा दिवस...
शालिवाहन राजाने शकांचा पराभव करून विजय पताका फडकवला तो दिवस...
गुढीपाडवा! सोने, चांदी, धानाच्या रूपाने घरी कायम लक्ष्मीचे वास्तव्य करण्याचा दिवस....
धनसंचायनाचा मंगल मुहूर्त!!!
या मंगल दिनी नव्या संकल्पांसाठी आपणास नवीनवर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
Sunday, March 22, 2009
धुंद होते............
धुंद होते शब्दा सारे
धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता
त्या फुलापाशी थांबना
सय्ये रमुनी सार्या
या जगात रिक्त
भाव असे परि
कैसे गुंफू गीत हे
धुंद होते शब्द सारे
मेघ दाटूनी गंध लहरुनि
बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी
बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले
भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा
विश्रांत हा शांत हा
धुंद होते शब्द सारे
धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता
त्या फुलापाशी थांबना
धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता
त्या फुलापाशी थांबना
सय्ये रमुनी सार्या
या जगात रिक्त
भाव असे परि
कैसे गुंफू गीत हे
धुंद होते शब्द सारे
मेघ दाटूनी गंध लहरुनि
बरसला मल्हार हा
चांदराती भाव गुंतुनी
बहरला निशिगंध हा
का कळेना काय झाले
भास की आभास सारे
जीवनाचा गंध हा
विश्रांत हा शांत हा
धुंद होते शब्द सारे
धुंद होत्या भावना
वार्यासंगे वाहता
त्या फुलापाशी थांबना
होळी-धुलीवंदन
होळीच्या आधी दोन दिवस म्हणजे रविवार पासूनच मनात एक हूरहुर लागून राहिली होती की, ह्या होळीला तर काहीच धमाल येणार नाही. आणि सगळ्यात वाईट म्हणजे आईच्या हाताची पुरणपोळी खायला नाही मिळणार. मी तर खूपच उदास होते. आणि त्यात पुढच्या आठवड्यात परीक्षा असल्याने तर रंगपंचमी खेळणा सुधा अवघड होता.
तरीही मी कुठुनतरी गुलाल मिळवण्यात यश मिळवला. होळी नाही निदान धुलीवंदन तर खेळलच पाहिजे असा मला सारखा वाटत होता.
पुण्यात असताना आम्ही सगळे मिळून होळी पेटवायचो. आणि होळी पेटलिकी मोठ्याने बॉम्बा मारायचो. खरच अविस्मरनिय दिवस आहेत ते.
आणि दुसर्या दिवशी तर खूपच मज्जा.... धुलीवंदन!!!!!!!!!!!! माझा आवडता सण. तशी माज़ी तयारी आठवडाभर आधीच चालू व्हायची. आमच्या बिल्डिंग मधे बच्चे पार्टीमधे तशी मी सगळ्यात मोठी. मग काय सगळी गँग घेऊन मी गच्ही वर जाणार. आणि खूप पाण्याचे फुगे फुगवायाचे आणि रस्त्यावर चालणार्या एकाला सुधा सोडायाचे नाही. आणि धुलीवंदन च्या दिवशी तर आम्ही सगळे मित्र एकत्र येऊन रांग खेळायचो.
ह्या आठवणी तर विसरनं खूपच कठीण आहे.
हो तर गुलाला मिळाल्यानंतर माज़ी एक मैत्रीण माज़या रूमवर आली. माज़या मनात एकदूम काय आला काय माहीत, पूर्ण गुलालाने मी तिला माखून टाकलं.
पण नंतर मला वाटलं की आता माज़ी काही खैर नाही. ही तर माज़ी कंप्लेंट करणार.... पण खरं सांगू तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिने मला कडकडून मिठी मारली. आणि म्हणाली अदिती धन्यवाद. खरच मी पण खूप मिस करत होते हा सण.......
मग तर मी विचार केला सगळ्यांच्या रूममधे जाउन रंग खेळायचे. आणि ठरल्याप्रमाणे आम्ही दोघींनी चौथ्या मजल्या पासून सुरूवात केली.
आणि म्हणता म्हणता 40 जणी जमलो. मन भरून आम्ही त्या थोड्याश्या गुलालमधे ओतप्रोत नहून गेलो. प्रत्येकाच्या चेहर्यावरचा तो आनंद मी अजूनही विसरू शकत नाही. प्रत्येक जन हेच म्हणत होता की धन्यवाद अदिती, सकल पौण आम्ही खूप मिस करत होतो हा सण.
आणि खरं सांगू माज़या हॉस्टेल मधील काही पाश्चात्य देशातील मुलीही आमच्या बरोबर होळीच्या सणाची मजा लुटली.
तर असाहा होलीचा दिवस अमेरिका मधे असूनही त्या गुलालाच्या रंगा सोबत एक वेगळीच छटा उमटौन गेला.
धन्यवाद मित्रांनो!!!!!!!!!!!!!
अगदी मनापासून धन्यवाद मला प्रोत्साहन दिल्याबद्दल.....
आज मलाही खूप च्ण वाटला हा ब्लॉग बनवाल्यानंतर
आणि आता कॉलेज ला सुट्टी असल्यामुळे रोज कहीना काही लिहीण्या साठी वेळ मिळणार...
जे पण काही मनात आहे ते पूर्णा पणे ह्या ब्लॉग वर लिहीण्याचा माझा प्रयत्न आहे.
आज मलाही खूप च्ण वाटला हा ब्लॉग बनवाल्यानंतर
आणि आता कॉलेज ला सुट्टी असल्यामुळे रोज कहीना काही लिहीण्या साठी वेळ मिळणार...
जे पण काही मनात आहे ते पूर्णा पणे ह्या ब्लॉग वर लिहीण्याचा माझा प्रयत्न आहे.
उत्तरायण
पायर्या उतरता उतरता
हलकेच ठेच लागते
आणि आठवणींच्या
गाभार्यला उमाळा येतो
आठवणी फिरत फिरत पुन्हा
एका क्षणी एकवतात
जेव्हा भानावर येत मन
तेव्हा पायर्या उतरून झालेल्या असतात
त्या जगातला मन या जगात फिरावता
एक बिंदू चमकतो
आणि आठवणीतला
बहर पुन्हा बहरतो
पायर्या उतरताना
उतरणीचा नैराश्य नसता
कारण दक्षिणायनात रमलेल्या
कळतच नाही कधी
उत्तरायण सामावता......
हलकेच ठेच लागते
आणि आठवणींच्या
गाभार्यला उमाळा येतो
आठवणी फिरत फिरत पुन्हा
एका क्षणी एकवतात
जेव्हा भानावर येत मन
तेव्हा पायर्या उतरून झालेल्या असतात
त्या जगातला मन या जगात फिरावता
एक बिंदू चमकतो
आणि आठवणीतला
बहर पुन्हा बहरतो
पायर्या उतरताना
उतरणीचा नैराश्य नसता
कारण दक्षिणायनात रमलेल्या
कळतच नाही कधी
उत्तरायण सामावता......
Subscribe to:
Posts (Atom)