Showing posts with label धमाल................ Show all posts
Showing posts with label धमाल................ Show all posts

Friday, May 29, 2009

उन्हाळ्याची सुट्टी................

खूप आटुरतेने वाट पाहत होते ह्या क्षणाची..... भारतात जायला मिळणार..... अजुन विश्वासच बसत नाही की मी घरी चालले आहे.
मज्जा वाटत आहे. लहानपणी सुट्टी लागली की उन्हाळ्याच्या सुट्टीत कोणाकडे जायचं, हा प्रश्न अभ्यास करण्या पेक्षा कितीतरी अवघड वाटायचा. आणि आता पुन्हा आता तोच प्रश्न आणि उत्तर ही. उन्हाळ्याच्या सुट्टीत मी घरी जाणार. खूप मजा करणार. आंबे खाणार, पावसात भिजनार आणि खूप काही. आई ननाना इतक्या दिवसानी भेटणार.