Sunday, April 19, 2009

पाहिले न मी तुला

पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
हिम वर्षवात ही कांती तव पाहुणी
तारका नभातल्या लजल्या मनातुनी
ओघाळले हिम तुषार गालावर थांबले
ना काळे.....
मृदू शय्या टोचाते स्वप्न नवे लोचनी
पहिले तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना काळे....
पाहिले......

नसतेस घरी तू जेव्हा......

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फटका होतो
नसतेस......
नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढावतो
ही धरा दिषाहीन होते
अन् चंद्र पोरका होतो
नसतेस...
येतात उन्हे दाराशी
हिरमूसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा
तव गंधा वाचून जातो
नसतेस....
तव मिठीत विरघळणार्‍या
मज स्मरती लाघव वेळा
श्वासाविन हृदय आडावे
मी तसाच आगतिक होतो
नसतेस.......
तू सांग सखे मज काय
मी सांगू या घर दारा
समईचा जीव उदास
माझ्या सह मीन मीन मिटतो
नसतेस....
ना अजून झालो मोठा
ना अजुनी स्वतंत्र झालो
तुज वाजून उमगत जाते
तू वाचून जन्मचं आडतो
नासतेस्.......